हा सण साजरा करण्याने शाळेतील बालकांमध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण..!
भोसरी । प्रतिनिधी
भारत हा शेतीप्रधान देश असून शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची ते दैवत मानले जाते. शेतकरी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतो. आणि बैलपोळा सण साजरा करून त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त़ करतो.
ग्रामीण भागामध्ये हा सण मोठ्या उत्साह मध्ये साजरा केला जातो. परंतु शहरी भागातील लोकांना या सणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. शहरी भागातील शाळेतील मुलांना बैलपोळा सणाविषयी माहिती व आपल्या भारतीय परंपरेची/ओळख व्हावी. यासाठी
शुक्रवार दिनांक २६/८/२०२२ रोजी. सामने पोळ्याच्या दिवशी सकाळी१ ०:०० वाजता मातीच्या बैलांची पूजन करून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
बैलपोळा विषयीची माहिती शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सायली संत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांना बैलपोळा विषयी माहिती सांगताना त्या म्हणाल्या
वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये वाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.
*आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात. त्याच्या साठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात.*
आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्साहात साजरा केला जातो.
बैलांचे पूजन करून साजरा करण्यात आलेल्या बैलपोळा सणांमध्ये विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे संयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे,
अध्यक्ष :संदीप बेंडुरे
संचालक: श्री अंकुशराव गोरडे, व सर्व संचालकांच्या मार्गदर्शना खाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, श्री प्रवीण भाकड यांनी केले.
नारायणहट शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवत असल्यामुळे परिसरात या शाळेचा सर्वत्र नावलौकिक वाढत असून कौतुक होत आहे.

