shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'झाडे लावा, झाडे जगवा' ही लोकचळवळ प्रभावी व्हावी =प्राचार्य शेळके

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे 'ही संत तुकारामांनी १७ व्या शतकात आम्हाला सांगितलेली शिकवण आजही गरजेची असून आजच्या जागतिकरणात 'झाडे लावा, झाडे जगवा 'ही लोकचळवळ अधिक प्रामाणिकपणे प्रभावी व्हावी, अशी अपेक्षा ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केली. ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संकुलात प्राचार्य शेळके यांच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ आदी उपस्थित होते.

डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनातून हा उपक्रम करण्यात आला. प्राचार्य विनोद रोहमारे यांनी झाडे आणि परिसर महत्व सांगून स्वागत केले. प्राचार्य सौ.रंजना जरे यांनी प्रास्ताविक केले.अमित त्रिभुवन, सतिश थोरात, रावसाहेब राशिनकर इत्यादींनी संयोजन केले. डॉ.बाबुराव उपाध्ये, प्राचार्य डॉ. गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले.किशोर बाहुले यांनी आभार मानले.
close