माळवाडगाव। वार्ताहर (संदीप आसने) :-
ग्रामपंचायत आणि ग्रामसभा हे गावाच्या विकासाचे साधन आहे सत्य मध्ये सरपंच कुणीही असो राजकारण आज आहे उद्या नाही राजकारण हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या विकास कामाला साथ द्यावी. गावाचा विकास थांबवू नका विकास कामाला विरोध करू नका असे आवाहन माळवाडगाव ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांनी माळवाडगाव ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत उपस्थित समोर केले.
माळवाडगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने उपाध्यक्ष नानासाहेब आसने आणि ग्रामसेवक आगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत विविध विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी गावातील नवीन शॉपिंग सेंटर, घरकुल, पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सीसीटीव्ही कॅमेरे, शाळेतील स्वच्छता, विविध रस्ते, पिण्याचे पाणी, स्टेट लाईट,सर्व प्रकारची थकित कर वसुली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आला यासह आदी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. गावाचा सर्वांगीण विकास करत असताना शासनाचे काही नियम असतात नियमानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो.
ग्रामपंचायत आणि ग्रामसभा हे विकासाचे साधन असते सत्ता कुणाची असो भविष्यात सरपंच कुणी असो मात्र ग्रामस्थांनी सत्तेवर असलेल्या सरपंच आणि त्यांच्या सदस्य मंडळाला विकास कामासाठी सहकार्य करा विकास कामाला विरोध करू नका दिवाळीपर्यंत विकासाची चांगली सेवा करून गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न असून गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन सरपंच बाबासाहेब चिडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे संजय आसने गोरख आसने श्रीकांत दळे किसनराव आसने लक्ष्मण आसने बाबासाहेब आसने दिलीपराव हुरुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शेख जिल्हा परिषद शाळेचे विक्रम कहांडळ उत्तमराव आसने साहेबराव आसने भास्कराव आसने प्रमोद आसने जयदीप आसने सतीश आसने सुरेश आसने प्रदीप आसने विठ्ठलराव आसने योगेश आसने सुधीर आसने भास्कर शिंदे अशोक आसने बबन आसने बाळासाहेब आसने सुनील शिंदे सुनील आसने सुनील वाबळे संजय खताळ अजित शेख अशोक भोंडगे अशोक साळवे दिगंबर आढाव दिगंबर नरवडे मंगेश साळवे विठ्ठल कावरे संजय बाबर मच्छिंद्र गाढे अनिल थोरात अशोक आसने पत्रकार विठ्ठलराव आसने भाऊसाहेब काळे संदीप आसने इम्रान शेख प्रवीण साळवे यासह आदी यावेळी उपस्थित होते उपस्थित आमचे सरपंच बाबासाहेब चिडे यांनी आभार मानले.
माळवाडगाव येथे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र बीट असून दोन पोलीस कर्मचारी या बीटसाठी देण्यात आले आहे, मात्र येथील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गावांमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून पोलीस चौकी करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून त्यासाठी माळवाडगाव ग्रामपंचायत कार्यालयातील एक खोली देण्याचा ठरावही ग्रामसभेत संमत करण्यात आला.

