नामदार विखेंचा सत्कार,
भावी निवडणुकांची नांदी!
रुक्ष वातावरणात पक्षी,
शोधणार हिरवी फांदी!
ना. विखेंचां सत्कार भावी,
निवडणुकांची नांदी!!
त्यांच्या एन्ट्री कडे आहे,
कित्येकांचे लक्ष!
कंटाळलेल्या त्रयस्थांचे,
कान टवकारून लक्ष!!
तिकडे असतो आदर सत्कार,
नाराज नसते कोणी!
ताकाला तहाणलेला त्याच्या,
ताटात पडते लोणी!!
ते नीट सांभाळतात मोठी,
नोट असो की ठोकळा!
कार्यकर्त्यांची कदर त्यांना,
मदतीला हात मोकळा!!
कार्यकर्त्यांचे पाठीराखे ते,
विरोधकां साठी आँधी!
ना. विखेंचा सत्कार, भावी,
निवडणुकांची नांदी!!
राजेंद्र नारायणे
9850608131

