शिक्षक समिती अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांचे वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप..
इंदापूर प्रतिनिधी: दि 3 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इंदापूर शाखेचे अध्यक्ष व शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री ज्ञानदेव बागल यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव येथे मुलांना शैक्षणिक साहित्य , वह्या , पेन व खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा , हायस्कूल व ग्रामस्थ यांचे वतीने बागल यांचा फेटा , शाल , पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व खावू वाटप करण्यात आले. आपल्या गुरुजींचा वाढदिवस असल्याने मुले आनंदून गेली. यावेळी भांडगाव हायस्कूल मुख्याध्यापक सुभाष गायकवाड , ग्रा पं सदस्य भोसले , परकाळे , शिक्षक पतसंस्थेचे व्हा चेअरमन रामचंद्र शिंदे , माजी संचालक राहूल जगताप , अशोक टिपाले , संतोष भोसले , प्रमोद ढंगे व मुले उपस्थित होती.

