shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव" १५-ऑगस्ट 'स्वातंत्र्य दिन'कार्यक्रम 'ध्वजवंदन' सैनिकांच्या हस्ते करून आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न!"


भोसरी । प्रतिनिधी :
       भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन)कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेची स्थापना याच वर्षातील असून शाळेच्या स्थापने नंतरचा हा पहिलाच १५ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन)कार्यक्रम असून तो मोठ्या उत्साहात व जोशात साजरा करण्यात आला.

       १५ ऑगस्ट कार्यक्रमासाठी 'ध्वजवंदन' भारत मातेची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या हस्ते करून एक अनोखी परंपरा शाळेने सुरू केली आहे. व ती यापुढे चालू ठेवून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.स्वातंत्र्याचा महोत्सव १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) कार्यक्रमानिमित्ताने शाळेच्या परिसरात रांगोळ्या, शोभिकरण, सजावट अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली होती.  'वंदे मातरम'! 'भारत माता की जय'! यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शाळेतील विद्यार्थी काही विद्यार्थी सैनिक, भारत माता, स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या महामानवाच्या वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

      ध्वजवंदन: मा.श्री. बाळासाहेब जाधव,(नायब सुभेदार) श्री. किरण चौधरी,(निवृत्त आर्मी, हवलदार), मा. श्री. विकास शेंडकर(निवृत्ती आर्मी, नायब सुभेदार), मा.श्री. संजय सस्ते (निवृत्त फौजी)या देशाची सेवा करणाऱ्या व केलेल्या सैनिकांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत! ध्वजगीत! संपन्न झाले.

        ध्वजवंदन: करणाऱ्या सैनिकांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ध्वजवंदना नंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये राष्ट्रभक्तीपर विचार विद्यार्थ्यांनी मांडले, देशभक्तीपर गीतांवर सामायिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली. या कार्यक्रमांनाउपस्थितानी भरभरून प्रतिसाद दिला.
     कार्यक्रमासाठी मा. श्री. महेशदादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा) हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले"नारायण हटशिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे अतिशय प्रेरणादायी असून समाजासाठी आदर्श ठरेल..!  सैनिक आणि शेतकरी हा देशाचा खरा आधारस्तंभ असून त्यांचे देशासाठीचे योगदान बहुमोल असे आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. व ते नारायण हट शाळेने जपली आहे. भोसरी विभागाचाआमदार या नात्याने नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य माझ्याकडून करण्यात येईल!"

   कार्यक्रम प्रसंगी सैनिकांनी विद्यार्थ्यांना/ उपस्थिताना मार्गदर्शन करून ज्वलंत देशाभिमान निर्माण केला.विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने मा.श्री.विवेक जगताप (सी.ए) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मा.श्री. विकास मडिगेरी(नगरसेवक पि.चि. महानगरपालिका) मा. श्री. मच्छिंद्र गोरडे (निवृत्त पी.एस.आय.)हे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन करण्यात आले.
         कार्यक्रमासाठी नारायण हट सहकारी गृहसंस्थेचे,ज्येष्ठ सभासद श्री.ज्ञानेश्वर सावंत, श्री. मानकर मामा, श्री. सुरेश पवार,(अध्यक्ष) श्री. यशवंत नेहरे,(सचिव) श्री.नवनाथ झोडगे,श्री. मनोज पवार, श्री. अंकुशराव  गोरडे, श्री. मुकुंदराव आवटे,श्री.सुयोगकुमार तारळकर, श्री. शिवरामजी काळे, श्री. रोहिदास गैंद,सौ. रोहिणी पवार, सौ. उज्वला थिटे, सौ.शोभा आरुडे यांच्यासह नारायण सहकारी गृह संस्थेचे सर्व संचालक, सभासद, महाराणा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाची शेवटी  विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: सौ. प्रतिभा तांबे यांनी केले.उपस्थिताचे स्वागत: मा. श्री. संदीप बेडुंरे (अध्यक्ष, नारायण हट शिक्षण, संस्था) यांनी केले.आभार: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे(सचिव, नारायण हट शिक्षण, संस्था) यांनी मानले.

       कार्यक्रमाचे संयोजन: प्रशालेच्या प्राचार्या, विजया चौगुले, श्री. अंकुशराव गोरडे, श्री. शिवरामजी काळे, श्री. रोहिदास गैंद,सायली संत, मीनल पाटील, प्रतिभा तांबे,प्रवीण भाकड, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, यांनी अतिशयपरिश्रम घेऊन केले.
close