shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

पडस्थळ येथे मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
इंदापूर प्रतिनिधी:भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जि. प प्राथ.शाळा पडस्थळ येथे मुख्याध्यापक रमेश जाधव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना आदर्शवत ठरेल असा निर्णय घेतला. मंथन परीक्षेत राज्यस्तरावरती, जिल्हास्तरावरती व तालुकास्तरावरती प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्याला सर्व ग्रामस्थांनी अनुमोदन दिले. चारुशीला हनुमंत कोळेकर,शौर्य संभाजी रेडके, श्रीतेज राहुल मारकड, सत्यजित विशाल मारकड, यश गणेश गव्हाणे या यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. 
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना फेटे बांधून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसहित ग्रामस्थांच्या सहभागासह गावातून प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा दिल्या.
विविध कलागुणांचे प्रदर्शन झाल्यानंतर मंथन परीक्षेतील वरील पाच विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भारत बोंगाणे, आप्पाराव मारकड, समाधान शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहशिक्षक सुरेश घोळवे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. उत्कृष्ट कर्तव्यपूर्तीबद्दल मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांचा सन्मान गावकऱ्यांतर्फे शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
यावेळी संदिपान मारकड, केरदास पवार, ग्रामसेवक महेश यादव,संदिपान राऊत, संभाजी रेडके, गणेश गव्हाणे,संदिपान कोळेकर, सचिन मारकड, उद्धव गव्हाणे, अशोक कोळेकर, गणेश बोंगाणे,शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close