shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ) :
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथे रयत संकुल सुरेगाव कोळपेवाडी चा संयुक्तपणे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपरावजी बोरनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजीराव वाबळे पाटील तसेच बाबुरावजी दगडूजी कोल्हे पाटील,छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रकाश चौरे सर पर्यवेक्षक श्री. लक्ष्मण कुदळे सर श्री.सुरेश तुपे सर,ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख श्री.राजेंद्र सोनवणे,किमान कौशल्य विभागप्रमुख श्री.अविनाश शिंदे, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्या सौ.छाया काकडे उपमुख्याध्यापक श्री.मधुकर गोडे सर,छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र पाचोरे सर,माजी विद्यार्थी श्री.गणेश सुपनर, सुनील चिने, राहुल रोकडे, डॉ . दत्तात्रय कोळपे तसेच  ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर कोळपे, विक्रम कोळपे, दत्तात्रय गोंडे, सोमनाथ गोंडे यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व,रांगोळी, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. दिलीपरावजी बोरनारे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  शुभेच्छा दिल्या.तसेच प्राचार्य श्री.प्रकाश चौरे सर यांनी आपल्या शुभसंदेशात तिरंग्याचे महत्त्व व क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. यावेळी विद्यालयातील एनसीसी व स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिवाजी जुंधारे व श्रीमती अनिता बेंद्रे यांनी केले.
close