shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरवडीतुन सुरु झालेल्या भारतीय स्वयंसेवक परिवाराचे धर्मकार्य वाखणण्याजोगे : लबडे महाराज

नेवासा । प्रतिनिधी:-
ह.भ.प गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व ह.भ.प गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या आशीर्वादाने तरवडी ता.नेवासा येथील भारतीय स्वयंसेवक परिवाराने ५व्या  श्रावण शनिवार व 39 व्या  हनुमान चालिसा त्यानिमित्त ३० श्रीमद् भगवद्गीता  शिवश्री चंद्रकांत महाराज लबडे , ऋषिकेश भापकर ,  ह. भ. प गणेश महाराज दरवडे , अमोल घोलप,सचिन भाऊ क्षीरसागर, तरवडी गावचे विद्यमान सरपंच श्री जालिंदर तुपे माजी सरपंच बाबासाहेब घुले यांच्या शुभ हस्ते श्रीमद् भगवद्गीता वाटप करण्यात आले.

गेल्या नउ ते दहा महिन्यापासुण परिवाराने नेवासा तालुक्यातील तरवडी येथे तुपे वस्तीवर हनुमाण चालीसा उपक्रम चालु केला , यामागे लोप पावत चालली संस्कृती , धर्मकार्य , व वाढत चाललेली पाच्छिमात्य संस्कृती त्यातुन समाजाचा होत चाललेला विनाश लहान बालकावर होणारे विपरीत परिणाम व संपत चाललेले संस्कार हे थाबांवेत.

सर्व समाजात एकोपा निर्माण व्हावा , लहान बालक व प्रोढांवर पाच्छिमात्य संस्कार न होता भारतातील पांरपारीक ऋषी मुनी साधु संताच्या विचाराने भावी पिढी घडावी आशा समाजहिताचे आनेक उपक्रम व कार्य परिवार करत आहे.

तसेच वृक्षारोपण करणे , महिलांना संरक्षण देणे , अनाथांना मदत करणे , रक्तदान शिबीर राबवणे , कुठल्या जाति पातीला थारा न देणे , प्रत्येक गावामधे हनुमाण चालिसा सुरु करणे , सर्व लोकांमधे भारतीय संस्कृती रुजवणे व गावागावात स्वयंसेवक निर्माण करणे हे परिवाराचे उदिष्टे आहेत ,

 भारतातील कुठलीही व्यक्ती स्वंयसेवक म्हणुन सहभागी होउ शकते , ही एक वसुदेव कुटुबंकम् या ध्येयाने प्रेरीत एक विचार प्रणाली असल्याचे भारतीय स्वयंसेवक परिवार ने सांगितले

या प्रसंगी तरवडी गावचे  , राजेंद्र बटुळे , , शकंर कन्हेरकर , नवनाथ कन्हेरकर ,  राउसाहेब घुले , रामभाउ कन्हेरकर ,  राउसाहेब तुपे , चद्रंभान शिरसाठ ,रविंद्र पेटे ,  राहुल वडगे , बाबासाहेब पेहेरे , योगेश कन्हेरकर , गणेश नलगे , दिगबंर ताकटे , कार्तीक राजे , अनिल क्षिरसागर , दत्ताञय तुपे , बाबासाहेब दरवडे , गोटीराम दरवडे , आर्जुन दरवडे , अर्जुन कन्हेरकर , भाउसाहेब झरेकर , ऋषिकेश तुपे,  सयाजी कन्हेरकर , अभिजित तुपे, परिक्षीत तुपे , गौरव तुपे , प्रशांत तुपे, विशाल तुपे ,संदीप घुले ,सागर तुपे, दत्तात्रय कनेरकर , भगवान घुले, भाऊसाहेब झरेकर , गणेश बटुळे, व सर्व तरवडी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
close