shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाप्पांन वरती अखेरचा रंगहात फिरवताना एक अवलिया कलाकार....!


आमचे कुंभार मामा मुळचे सातारचे पारंपारीक व्यवसाय रंगकाम,गणपती बनवणे,बैल मुर्ती बनवणे,मातीच्या चुली बनवणे,दिवाळीला पणत्या,लक्ष्मी मुर्ती बनवणे,असे विविध कलाकृती बनवणारे आमचे कुंभार मामा.हा व्यवसाय करतच ते आमच्या अण्णासाहेब मगर विद्यालय ,मांजरी खुर्द ,शाळेचे शिपाई कामगार गेली 25 वर्षांपासुन ते शिपाई म्हणुन काम करतात.ते करतच सुंदर मुर्तीकाम करतात.मला आठवतंय मि जेव्हा लहान होतो. 

दुसरी - तिसरी मध्ये तेव्हा याच मामा कडे जायचो आम्ही सगळे गणपती बाप्पांना रंगकाम करायला जेव्हा शाळेला सुट्टी शनिवार रविवार तेव्हा दिवसभर जायचो मामा कडे तेव्हा मामा दहा रुपये जरी दिले तरी आजच्या हजार रुपयाला त्याची किंमत नसेल.आमचं बालपण सर्व जवळच्या मिञांचं सोबतच गेलं मला बाहेर खेळायला जाण्यापेक्षा रंगकाम करायला आवडायचे त्याहुन जास्त आनंद हा  मामा द्यायचे त्या दहा रुपयाचा असायचा तसे शाळेत चिञकला हा विषय माझ्या आवडीचा खरं तर  नंतर मि पाचवी पासुन मामा जिथे होते शिपाई त्या शाळेत पाचवी पासुन दाखला झाला.तरी माझा मामा सोबत रंगकाम चा प्रवास चालु होताच.शाळा शिकतच त्यांना मदत करायचो चार पैसे मिळाले तर जपुन ठेवायचो माझी परीस्थिती हलाखीची हे मामा ना माहीत होतंच.ते मला प्रत्येक वर्षी काही वह्या ,पुस्तके भेट द्यायचे.जेव्हा मला अडचणी आले तेव्हा हेच मामा माझ्या साठी धाऊन आलेत.आज मला शाळा सोडुन 15-16 वर्ष झाले. आज चांगला पैसा,नाव कमवले.पण तेव्हाचे आठवणी ते दिवस ती मदत कधी विसरु नाही शकत .काल अचानक भेटलो मामांना तर अखेरचा रंगहात फिरवताना दिसले. आज पण ते शिपाई काम करत रंगकाम करतात.आपला पारंपारीक व्यवसाय जपतात. अशा अवलीया कलाकाराला मनःपुर्वक शुभेच्छा 

आपलाच - सुजित सुरवसे ( सिने मेकअप डिझाईनर )
close