इंदापूर प्रतिनिधी: श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये पर्यावरण पुरक रक्षाबंधन साजरी करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी स्वतः राख्या बनवून शाळेत शाळेच्या मैदानातील वृक्षांना राखी बांधून औक्षण केले.
त्यांना कला शिक्षक श्री जगताप पी डी सर व शेळके मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तर जामदार सरांनी कार्यक्रमाचे महत्व व पर्यावरण रक्षण करण्याची गरज विद्यार्थ्यांना सांगितली.शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

