शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२
ॲड. सचिनभाऊ जगताप एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - सिनेअभिनेते श्री सयाजी शिंदे..!!
अहमदनगर : मा.ॲड. श्री सचिनभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत त्यांनी केलेल्या विकास कामां बाबत कृतज्ञता सोहळा व अभिष्टिंतन सोहळा सचिनभाऊ जगताप मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ बनपिंप्री यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास पद्मश्री मा. श्री पोपटरावजी पवार (कार्याध्यक्ष आदर्श गाव समिती महाराष्ट्र राज्य), पद्मश्री मा. सौ राहीबाई पोपेरे (बीजमाता), प्रसिद्ध अभिनेते मा. श्री सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सिने अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, सचिनभाऊ यांचा समाजकारणापासून ते राजकारणापर्यंतचा जनसेवेचा प्रवास थक्क करणारा आहे. याप्रसंगी त्यांनी सचिनभाऊ यांनी सुमारे १५० पेक्षा जास्त बांधलेल्या साखळी बंधाऱ्याच्या संकल्पनेतून गटात केलेल्या जलसंधारणाच्या कामांचे विशेष कौतुक केले. गटातील विकासकामं, पशुपालन, गोवंश पालन, अश्वपालन याबरोबच वृक्ष लागवडीची चळवळ उभारण्यास देखील सचिनभाऊ यांनी पुढाकार घावा असे ते म्हणाले.
पद्मश्री पोपटरावजी पवार म्हणाले की, सचिनभाऊ माझ्याशी नेहमी जलसंधारण आणि शेतीविषयक विषयांवर चर्चा करत असतात. त्यांच्या गटातील शेतकऱ्यांच्या साठीच्या नवनवीन योजनांसाठी त्यांचा सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा चालू असतो.
बिजमाता सौ राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, सचिनभाऊ यांचे शेतीविषयक प्रयोग आणि स्वतःला असलेली शेती करण्याची आवड या नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. सचिनभाऊ यांच्यात कोणतेही काम मार्गी लावण्याची कला असून त्यांनी येणाऱ्या काळात शेतीतील देशी बिजाच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे.
याप्रसंगी सचिनभाऊ यांची बनपिंप्री ग्रामस्थांच्या वतीने पेढे तुला करण्यात आली.
आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर तसेच शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिकांचे आभार मानले.
या कार्यक्रमास आदरणीय आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार राहुलदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्यामअण्णा शेलार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

