शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२
'मुळा' चे ओव्हरफ्लो झालेले पाणी वांबोरी चारी मार्गे पोहचले पाथर्डीला ; आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केली पाहणी..!!
पाथर्डी : मुळा धरणातून ओव्हरफ्लो झालेले पाणी हे वांबोरी चारीद्वारे पाथर्डी तालुक्यातील गावांना सोडण्यात आले आहे. आज पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गीतेवाडी, डोंगरवाडी, लोहसर, भोसे, सातवड, कवडगाव येथील पाणी प्रवाहाचा प्रत्यक्ष आढावा आमदार प्राजक्त तनपूरे यांनी काल घेतला.
मुळा धरणातून ओव्हरफ्लो झालेले पाणी पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये पोहोचण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. वांबोरी चारीच्या पंपाच्या दुरुस्तीची कामे अधिकाऱ्यांनी आदेशावरून तात्काळ पूर्ण केली त्यामुळे येथवर पाणी पोहोचणे शक्य झाले.
"मागच्या उन्हाळ्यात जलसंपदा मंत्र्यांची विशेष परवानगी घेऊन आपण फेब्रुवारी महिन्यातही या भागात पाणी सोडले होते. यापुढेही अधिकाधिक पाणी पाथर्डीला मिळावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माजी जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांच्यासोबत बैठका घेऊन वांबोरी चारी टप्पा २ साठी देखील आपण प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे. आलेल्या सरकारकडे मी निश्चित त्यावर कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे- आमदार प्राजक्त तनपूरे"
या गावांतील तलावांमध्ये चारीद्वारे योग्य दाबाने पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात सुनियोजितता आहे का, अधिकाऱ्यांचे लक्ष आहे का या सर्व बाबींची चाचपणी मी स्वतः करत आहे. पावसाची अनिश्चतता असली तरी या चारीद्वारे येथील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
सातवड पर्यंत पाणी पोहोचले आहे, यापुढील गावातही लवकरच पाणी पुरवले जाईल. मिरी लाईनही सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणीही फोडतोड करून पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांना योग्य पाणी मिळेल असा प्रयत्न असेही तनपूरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

