निर्मलनगर येथे स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १५ / नगर येथील सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे नगरसेविका सौ . रूपाली वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला .सर्वप्रथम नगरसेविका रूपाली वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले . राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली .
अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण आज स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे नगरसेविका रूपाली वारे यांनी सांगितले .
यावेळी राहूल सांगळे , डॉ . ताजवे , अभिषेक खामकर यांनी देशभक्तीपर भाषण करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला . सामाजिक कार्यकर्ते बंटी हिवाळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजुनही काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले . तसेच डॉ .ताजवे यांनी शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले .
यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, युवा नेतृत्व राहुल सांगळे ,संतोष काळे, सुशांत भिंगारदिवे, प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार,साजिद इनामदार , प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर,दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी ,वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे, शरयु काळे, सेजल काळे,आहिरे मॅडम, गहिले मॅडम आदी महिला व नागरिक उपस्थित होते .

