*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आष्टी पोलीस स्टेशन यांचे वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली*,
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
वर्धा: दि. 15 / वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत आज दि.14/08/2022 रोजी 3/30 वा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस स्टेशन आष्टी यांचे वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती.
सदर रॅलीत एम एस इ बी कार्यालय आष्टी, वनविभाग आष्टी, गृह रक्षक दल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, हजर झाले होते सदर रॅली ही आष्टी टाऊन नवीन आष्टी तसेच पेठ अहमदपूर मधून अतिशय आनंदाचे आणि उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आली आष्टीतील नागरिकांनीही या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

