shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई.एस .हायस्कूल व जुनिअर कॉलेज, निमसाखर येथे ""स्वातंत्र्य अमृत महोत्सव" निमित्त प्रभात फेरीचे आयोजन.


 एन.  ई.एस .हायस्कूल व जुनिअर कॉलेज, निमसाखर येथे ""स्वातंत्र्य अमृत महोत्सव" निमित्त प्रभात फेरीचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक ८ ऑगस्ट २०२२  एन. ई.एस .हायस्कूल व जुनिअर कॉलेज, निमसाखर येथे ""स्वातंत्र्य अमृत महोत्सव" निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे आयोजन आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मधुकर शंकर खरात सर ,तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर, यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले होते. त्यावेळी विद्यालयातील अनेक मुलांनी व मुलींनी हर घर तिरंगा तसेच भारत माता की जय, अशा  विविध घोषणा देऊन जनजागृती  केली. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर घोषणा देत उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. प्रभात फेरीमुळे सर्व परिसरातील वातावरण अतिशय चैतन्यमय व प्रसन्नमय झाले.
close