shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशैक्षणिक कामे बंद करा आम्हाला मुलांना शिकवू द्या अशा शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांच्या विविध मागण्यासाठी शिक्षक समिती इंदापूर व बारामती शाखेच्या वतीने प्रांत कार्यालय बारामती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन..

अशैक्षणिक कामे बंद करा आम्हाला मुलांना शिकवू द्या अशा  शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांच्या विविध मागण्यासाठी शिक्षक समिती इंदापूर व बारामती शाखेच्या वतीने प्रांत कार्यालय बारामती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन..

प्रांत अधिकारी दादासो कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर....
इंदापूर प्रतिनिधी:दि ८ इंदापुर वार्ताहर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षक समिती इंदापूर व बारामती शाखेच्या वतीने बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रांत अधिकारी दादासो कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर , ज्ञानदेव बागल , सुनिल वाघ , आबा जगताप , सचिन हिलाळ , संतोष हेगडे यांनी मनोगते व्यक्त केली. आम्हाला मुलांना शिकवू द्या , अशैक्षणिक कामे बंद करा , जुनी पेन्शन लागू करावी , सर्व मुलांना मोफत गणवेश मिळावा ,  सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर कराव्यात , केंद्र प्रमुख पदे भरावीत , एम एस सीआयटी मुदत वाढ मिळावी , पगार एक तारखेस करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

    यावेळी तुकाराम ठोंबरे , भारत ननवरे , विनय मखरे , नजीर शिकीलकर , सुनिल शिंदे , अरूण मिरगणे , विलास पानसरे , लालासो वणवे , विकास भोसले , नितीन वाघमोडे , मोहन भगत , शांताराम रणवरे , प्रताप शिरसट , सचिन गायकवाड , भारत गायकवाड ,  भालचंद्र भोसले ,विनोद घोघरे , शत्रुघ्न शेळके , राहुल कानगुडे , सचिन वेदपाठक , पंकज रणवरे , दिगंबर तावरे , प्रदिप रणमोडे , दत्तात्रय शिर्के , इंदापूर व बारामती तालुक्यातील शेकडो प्राथमिक शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी झाले.
close