shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भटक्या विमुक्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात साहित्यिक टि एस चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांची घेतली भेट..!

औरंगाबाद :- आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य विमुक्त भटके समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष टि.एस चव्हाण, सचिव दुर्गादास गुडे, सहसचिव पुंडलीक धनगर, जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधव या पदाधिकाऱ्यांनी  टि एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली.मा. नामदार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट घेतली. व 
भटक्या विमुक्त जनजातीच्या अनेक समस्या बाबत चर्चा केली.

        साहित्यिक श्री टि.एस.चव्हाण

यावेळी भटक्या विमुक्त समाजातील तरूणांना व्यवसायासाठी मुद्रा लोन मंजूर करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले व भटक्यांना स्वतंत्र 9% आरक्षण देणे बाबत केंद्र सरकार विचार करत आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. असेही मंत्री महोदयांनी बैठकीदरम्यान सांगितले. आणखी सविस्तर माहितीसाठी दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी शनिवारी ठीक चार वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
close