श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशन शाखा श्रीरामपूर (श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार) संघटनेची बैठक,नुकतीच शेवगांव येथील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मीनाताई कळकुंभे यांच्या अध्यक्षतेखाली येथील संगमनेर रोडवरील व्ही.आय. पी.रेस्ट हाऊस याठिकाणी उत्साहात संपन्न झाली.यावेळी सर्वप्रथमत: शिवसंग्रामचे आद्यप्रवर्तक स्व.विनायकराव मेटे तसेच खंडाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार स्व.सुभाषराव साळुंके आणि यादरम्यानच्या काळात संघटनेचे जे सभासद मयत झाले त्यांना दोन मिनिट उभे राहून संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर मनोगतात संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ. मीनाताई कळकुंभे म्हणाल्या की तुम्ही मला संघटनेचे सभासद होऊन ताकद द्या,मी तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक जाधव, नरेंद खरात, शिवाजी सैद,सोमनाथ देवकर, कैलास भनगे, चंद्रकांत गायकवाड, अजिमभाई पठाण, दिलीप त्रिभुवन इत्यादींनी आपले विचार मांडले, यावेळी अरुण खंडागळे, राजेंद्र वाघ, सलाम शेख, राहुल म्हस्के,धनंजय झिरंगे, विजय म्हस्के, चंद्रकांत गायकवाड, कैलास भनगे, नरेंद्र खरात, शिवाजी सैद, गोपाल लिंगायत, सोमनाथ देवकर, संतोष वेताळ, प्रशांत भागवत, दिलीप त्रिभुवन,शांताराम बकरे किरण काळे,मंगेश छतवानी, मिनाक्षी कळकुंभे, पोपटराव पाखरे, अशोक औटी, पुंजा बर्डे, सुधाकर नजन,संजय मरकड आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

