shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भांडगावतील निराभिमा कर्मचाऱ्यांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.

भांडगावतील निराभिमा कर्मचाऱ्यांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.

शालेय साहित्य, खाऊ वाटप व केक कापून केला वाढदिवस साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:भांडगाव गावातील निरा भिमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या ,पेन व खाऊ बिस्कीट, चॉकलेट वाटप करून केक कापून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी माजी सरपंच व सदस्य भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका अंकुश गायकवाड , भाजपा भटक्या विमुक्त-विमुक्त सेल हक्क परिषद इंदापूर तालुका  सहसंयोजक दत्तात्रय जाधव ,माजी उपसरपंच तानाजी चांडोले, किशोर गायकवाड, शिवाजी चव्हाण, गजेंद्र वीर, बबन कदम ,किरण गायकवाड ,नितीन गायकवाड, राजेंद्र गायकवाड, घनश्याम गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव बागल, सहशिक्षक राहुल जगताप,  संतोष भोसले, रामचंद्र शिंदे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक दत्तात्रय जाधव यांनी केले तर आभार रामचंद्र शिंदे यांनी केले.
close