प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १४ / अहमदनगर शहर व ग्रामीण कराटे संघटने मार्फत जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, अहमदनगर शहर व ग्रामीण कराटे संघटना हे जिल्ह्यातील अधिकृत संघटना असून या संघटनेस महाराष्ट्र कराटे असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशनची देखील मान्यता आहे.
शहरातील भगवान बाबा चौक येथील गंगालाॅन या ठिकाणी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून जवळपास ४२ कराटे प्रशिक्षक सहभागी झाले होते. परिक्षक रविंद्र कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिक्षा प्रकिया पार पडली. जे प्रशिक्षक उत्तीर्ण आहे त्यांना पुढील काळात शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत किंवा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड चाचणी म्हणून १६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हा सचिव अमोल काजळे यांनी दिले तर जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे खजिनदार जयसिंग काळे यांनी केले.
या सर्व कार्यक्रम आयोजना साठी प्रशांत पालवे यांनी विशेष कष्ट घेतले. तसेच यावेळी या पंच परीक्षेसाठी. पुण्याहून आलेले प्रशिक्षक रवींद्र कराळे यांनी सर्व पंचांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी अनिल मिसाळ , अमोल शेटे , धिरज डावरे ,सागर थोरात , नवनाथ दारकुंडे ,प्रशांत थोरात ,सबिल सय्यद , वसिम शेख (श्रीरामपूर) , निता शिंदे ,बाबा सकट , सरफराज सय्यद, आदिल सय्यद, नीलफोर शेख , वसीम शेख आदी कराटे प्रशिक्षक उपस्थित होते.

