shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..!



जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
 
मुंबई, दि. 14:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील 

 महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील

 उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित

 आदिवासी विकास

गिरीष महाजन

 ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

गुलाबराव पाटील

 पाणीपुरवठा व स्वच्छता 

 दादा भुसे

 बंदरे व खनिकर्म 

संजय राठोड

 अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे

 कामगार

 संदीपान भुमरे

 रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 उदय सामंत

 उद्योग

 प्रा.तानाजी सावंत

 सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार

कृषी

दीपक केसरकर

शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई

 राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा

 पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास
close