shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन् ई एस् हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

 एन् ई एस् हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर  या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती  साजरी. 
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर एज्युकेशन सोसायटी निमसाखर संचलित एन् ई एस् हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर ता इंदापूर जि पुणे या विद्यालयात  दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी  लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  संजयकुमार  सूर्यकांतराव रणवरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष  संजयकुमार  रणवरे व विद्यालयाचे प्राचार्य  चंद्रकांत रणवरे सर यांनी दोन्ही महापुरूषांचे थोर विचार आचरणात आणणे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थीनींनी सुंदर असा पोवाडा सादर केला तसेच माध्यमिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी यादिनाचे औचित्य साधून भाषणं केली. 
याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक  खरात सर, ज्युनिअर कॉलेज चे विभाग प्रमुख  बोंद्रे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close