*अखेर खुनाला फुटली वाचा........भिगवण पोलीसांनी आरोपीने केलेल्या नियोजन बध्द खुनाचा अखेर लावला छडा, आरोपीस ठोकल्या बेडया..*
इंदापूर -भिगवण :दि २ हातात कोणताही धागादोरा नसताना १५० कीमी वर झालेल्या खुनाला अखेर भिगवण पोलिसांनी वाचा फोडली असून आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती भिगवण सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत :दिनांक.०८/०७/२०२२,रोजी सकाळी ०८:३० वा चे सुमारास खबर देणार सौ. शामल अमोल पवार, पोलीस पाटील पोंधवडी, बंडगरवाडी यांनी खबर दिली की, मौजे पोंधवडी गावचे हदीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापुर हायवे रोड लगत कि.मी नंबर, १०३/३३० चे तीन मोऱ्या असलेल्या पुलाचे जवळ सर्व्हिस रोड लगत एक पुरूष इसम मयत स्थितीत अंदाजे ५० ते ५५ वर्ष, अंगाने मजबुत त्याचे नेसणीस आकाशी रंगाचा फुल बाहयांचा शर्ट, निळसर उभ्या रंगाची पॅन्ट असे वर्णनचा मयत आहे. या मिळालेल्या माहितीवरून भिगवण पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मयतदाखल करून पुढील तपास करण्यात आला.
यातील अनोळखी मयताचे जवळ तपासात काहीच मिळुन आले नाही त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलीसांचे समोर एक चॅलेंज निर्माण झालेले असताना मा.दिलीप पवार सो, सहा.पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक टिम तयार करून पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परीसरामध्ये सलग तीन दिवस मयताची प्रसिध्दी करून तसेच अतिशय सचोटीने व बारकाईने तांत्रिक विश्लेषन, विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज व गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती काढुन इसम नामे आकाश वामन काळोखे, वय.२३वर्ष, व्यवसाय. शेती, रा.देहुगाव, विठलवाडी, ता.हवेली, जि.पुणे यास देहुगाव, विठलवाडी येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविताच तो पोपटा सारखा बोलु लागला व त्याने गुन्हाची कबुली दिली की, दिनांक.०७/०७/२०२२ रोजी सकाळी ०८:०० वा चे सुमारास मौजे देहुगाव, विठलवाडी, ता.हवेली, जि.पुणे येथे त्याचे राहते घराचे पार्कीगचे जवळ त्याचे मालकिचा उभा असलेल्या ट्रॅक्टर नं.एम.एच.१४/जी.वाय.५४२९ चे ट्रॉलीची लोखंडी प्लेट मयत नामे अरूण सिंह, वय.५३वर्ष, रा.बब्बन सिंह, गांव भेदौरा, पोस्ट भेदौरा, बसेवा, आजमगढ, उत्तर प्रदेश हा चोरून घेवुन जात असताना त्यास पकडून त्यास हाताने, लाथांनी त्यांचे तोंडावर तसेच लोखंडी टॉमीने त्याचे कपाळाचे वर डोक्यात तसेच उजवे कानाचे पाठीमागे मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खुन केला. त्यानंतर मयत इसमाची परीसरामध्ये ओळख पटु नये म्हणुन स्वतःचे वेरना गाडी नंबर.एम.एच.१४/डी.एन.८७९७ ही मध्ये त्यास दिवसभर ठेवून दिनांक.०८/०७/२०२२ रोजी रात्रौ ००:१० वा चे सुमारास त्यास स्वत:चे वेरना गाडी नंबर.एम. एच.१४/डी.एन.८७९७ ही मधुन देहुगाव, विठलवाडी येथुन सुमारे १५० किलो मीटर अंतरावर आणुन मौजे पोधवडी गावचे हदीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापुर रोडचे किमी नंबर. १०३/३३० चे सर्व्हीस रोडचे चे लगत तीन मोऱ्या पुलाचे जवळ त्याची मयत बॉडी टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. यातील आरोपी याचे कडुन गुन्हा केलेले ठिकाण, तसेच गुन्हा केले नंतर मयत बॉडी टाकलेले ठिकाण व त्याने गुन्हया करण्यासाठी वापरलेले हत्यार लोखंडी टॉमी व वेरना गाडी नंबर.एम.एच.१४/डी.एन.८७९७ ही त्याचे ताब्यातून जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन भिगवण पोलीस स्टेशन, गन्हा रजिसर १९२/२०२२. भादवि कलम.३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी आकाश वामन काळोखे वय वर्ष व्यवसाय, शेती, रा.देहगाव, विठठूलवाडी, ता.हवेली, जि.पुणे यास सदर गन्हयात अटक केली.गुन्ह्याचा पुढील तपास मा.दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे. भिगवण पोटेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, पोलीस अमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने. हसीम मलाणी. अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, यांनी केली आहे.

