बिजवडी ग्रामपंचायततिच्यावतीने विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ संपन्न.
वनगळी ( तुपे वस्ती) रस्ता कॉंक्रिटीकरण, पारेकर वस्ती येथे वॉटर फिल्टर, घंटागाडी चे उद्घाटन .
इंदापूर प्रतिनिधी:मौजे बिजवडी ग्रामपंचायत अंतर्गत वनगळी तुपे वस्ती येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तसेच पारेकर वस्ती येथे पंधरावा वित्त आयोग मधून वॉटर फिल्टर बसवणे, कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी इत्यादी विकास कामांचे उद्घाटन समारंभ दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे ,सरपंच दादाराव काळेल, उपसरपंच प्रियांका पारेकर, अमोल देवकाते, वकील अनिल पारेकर, मोहन पारेकर, दीपक पाटील, पोपटराव पारेकर, पांडुरंग पारेकर, ग्रा.पं. सदस्य दादाराव कोकणे ,ग्रा.पं. सदस्य सुधीर चव्हाण, ग्रा.पं. सदस्य सुरेखा गायकवाड, ग्रामसेवक शेळके,पै. तुकाराम पारेकर, शशिकांत चव्हाण, नंदू पिटेकर, सुधीर खरात, दशरथ पारेकर ,एकनाथ पारेकर, देविदास पारेकर, भानुदास पारेकर, विष्णू पारेकर, किरण पारेकर, हनुमंत तुपे, सुभाष पारेकर ,अजय पारेकर व वनगळी पारेकर वस्तीचे सगळे ग्रामस्थ उपस्थित होते .

