गोरक्षनाथ गडावर भाविकांची मांदियाळी...!!
नगर । प्रतिनिधी ;दि.१५, ऑगस्ट २०२२:
आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार, संकष्ट चतुर्थी व १५ ऑगस्ट निमित्ताने सुटीचा दिवस असल्याने अहमदनगर मध्ये सुप्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावर भाविकांची मांदियाळी दिसून आली.
यावेळी नगर एम आय डी सी पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. युवराज आठरे यांनी गोरक्षनाथ गडाला व डोंगरगण येथे भेट दिली व गोरक्षनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे देवस्थान ट्रस्टचे वतीने सन्मान करण्यात आले.
यावेळी त्यांचे सोबत पोलीस काॅ.सुरेश सानप,एस सी पवार, पि एन मिसाळ , किशोर जाधव,डोंगरगण गावाचे पोलिस पाटील मते आदी उपस्थित होते.
गोरक्षनाथ गडावर भाविकांची मांदियाळी...!!
गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथ महाराजांनी तपश्चर्या करून वास्तव केल्याचे नवनाथ ग्रंथात आढळते. या ठिकाणी श्रावण महिन्यातील तिस-या सोमवारी मोठी यात्रा भरते. आज ही गडावर भाविकांची मोठी गर्दी होती. अनेक भाविकांची गोरक्षनांवर श्रध्दा असल्याने या ठिकाणी अन्नदान करतात. आज या पवित्र ठिकाणी भाविक भक्तांची मोठी मांदियाळी दिसून आली.

