shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वतंत्रदिन आमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आज इंदापुर तालुका किसान मोर्चाच्या वतीने आज पळसदेव या ठिकाणी उजनी धरणाच्या पाण्याचे पुज

स्वतंत्रदिन आमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आज इंदापुर तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आज पळसदेव या ठिकाणी उजनी धरणाच्या पाण्याचे पुजन


उजनी बॕकवाॕटर च्या पंचक्रोशीतील शेतकर्यांमध्ये दुष्काळाचे संकट दूर गेल्याचे समाधान.

इंदापूर प्रतिनिधी:आज इंदापूर तालुक्याला वरदान लाभलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदी वातावरण झालेले आहे. पाणी हे शेतीसाठी उपयुक्त आसल्याने व धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने उजनी बॕकवाॕटर च्या पंचक्रोशीतील शेतकर्यांमध्ये दुष्काळाचे संकट दूर गेल्याचे समाधान आहे.
 म्हणून आज स्वतंत्रदिन आमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आज इंदापुर तालुका किसान मोर्चाच्या वतीने आज पळसदेव या ठिकाणी उजनी धरणाच्या पाण्याचे पुजन करण्यात आले. 
यावेळी किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली-काका चवरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तथा कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी आकाश कांबळे, पळसदेव भाजपचे ज्येष्ठ नेते भालचंद्र-बापू बांडे, पळसदेव भाजपचे अध्यक्ष रावसाहेब काळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे, ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी गटप्रमुख गणपतराव करे, माजी गणप्रमुख गणेश भांडवलकर, इंदापुर तालुका प्रहार संघटना ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष दादाराम शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती किरण काळे यांनी दिली.
close