shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना फळझाडे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना फळझाडे वाटप

निरनिमगाव येथे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती इंदापूर व राज्य शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून शेतकरी मेळावा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती इंदापूर व राज्य शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून शेतकरी मेळावा व ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना फळझाडे वाटप करण्याचा कार्यक्रम अनंतराव पवार विद्यालय निरनिमगाव येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते पार पडला.
 कार्यक्रमात शासनाच्या असणाऱ्या निरनिराळ्या योजना तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी यावर कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले व शेतकर्यांशी संवाद साधून त्यांचे असणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
सदरचा शेतकरी मेळावा अनिल देशमुख  कृषी विकास अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तसेच विजयकुमार परीट गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.
कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी भाऊ रुपनवर, पंचायत समिती कृषी अधिकारी राजेंद्र काळे  निर-निमगाव सोसायटीचे चेअरमन रणजीत घोगरे, विस्तार अधिकारी अजित घोगरे तसेच गावातील मान्यवर मंडळी शेतकरी बांधव उपस्थित होते.
close