shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हातील 11 वर्षा खालील खेळाडूंसाठी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

अहमदनगर: दि. २२/अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. ही स्पर्धा 11 वर्षा खालिल अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आयोजित केली आहे. ह्या स्पर्धेतून अहमदनगर जिल्ह्यातील 2 मुले व 2 मुली राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जी रत्नागिरी येथे होणार आहे तेथे खेळण्यासाठी जातील.महाजन वाडी मंगल कार्यालय, जुना कापड बाजार, अहमदनगर या ठिकाणी सदर स्पर्धा  होणार आहे .

1 जाने 20011 नंतर जन्मलेले अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडू म्हणजेच 11 वर्षा खालील खेळाडू ह्यांच्या साठी ही जिल्हा निवड स्पर्धा आयोजित केली आहे. 2 मुले व 2 मुली रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. येताना बुद्धीबळ पट, डबा, पिण्याचे पाणी इ. घेऊन येणे. पहिल्या दहा खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी देण्यात येतील. सर्व सहभगी खेळाडूंना प्रमाण पत्र देण्यात येतील
अधिक माहिती साठी सपंर्क:-
चेतन कड--7276678893
देवेंद्र ढोकळे-- 9511656063
close