shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकुर भागातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करा अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह आंदोलन -शिवश्री राहुल ढेंबरे पाटील

*साकुर पठारभागातील खड्डेमय रस्त्यांबाबत शिवप्रतिष्ठाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढील दोन महिन्यांचे अल्टिमेटम...


संगमनेर (प्रतिनीधी)-
साकुर पठारभागातील खड्डेमय रस्ते दुरूस्तीसाठी सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सदर निवेदन देण्यात आले होते. शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे २७ सप्टेंबर २०२१ रोजी साकुर पठार भागातील नागरिकांच्या वतीने रस्तावरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन करण्यात आले. मांडवे बु । ते वरवंडी रोडचे गेल्या एक वर्षापासून फक्त साईड पट्टयांचेच काम अतिशय निक्रुष्टपणे संथगतीने सुरू आहे. 

साकुर ते बिरेवाडी फाटा २ किमी रस्ता काहीप्रमाणात तर उर्वरित संपुर्ण रस्ताच खड्डेमय असुन त्यापैकी १ किमी रस्त्याचे उद्घाटन झाले पण मुहुर्त नाही, उर्वरित रस्त्याला निधीची तरतूद नाही. रणखांब फाटा ते दरेवाडी सदर रस्त्याची जबाबदारीच जि.प.,सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तिन्ही विभाग स्वीकारत नाहीत. २००९ ला झालेल्या सदर रस्त्याला गेली तीन वर्षांपासून कोणी वालीच उरला नाही तर या रस्त्याचे काम होणार तरी कसे ? सदरचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन जि.प.कडे(१रूपया निधी न देता)नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे तोंडी सांगितले जाते. 

साकुर ते नांदुरखंदरमाळ रोड-व्रुक्षलागवड आंदोलनाचे निवेदनांनंतर प्रशासनाची हद्दच मोठमोठे दगडगोटे टाकून खड्डे बुजविण्याचे काम...हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मुरूम टाकून खड्डे भरले. साकुर ते जांबुत पर्यंत डांबरीकरण झाले पण जांबुत ते नांदुरखंदरमाळ फक्त १ किमी पर्यंत १ लेअर आणि संपूर्ण रस्ताच राम भरोसे.

दळणवळणासाठी हे रस्ते पठारभागाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी, विद्यार्थ्यांना तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा, खड्डेमय रस्त्यांत वृक्षलागवड आंदोलनानंतर देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नाही.सबंधित प्रशासन झोपेचे सोंग घेत असेल तर साकुर पठारभागातील तमाम जनतेसह पुढील दोन महिन्यांनंतर मा.उप विभागीय अधिकारी, संगमनेर यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे मा.उपविभागीय अधिकारी/तहसीलदार, संगमनेर तसेच संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. 
_ शिवश्री राहुल ढेंबरे पाटील
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य
close