shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सन1980 पासून "27 सप्टेंबर" हा सर्व जगात "जागतिक पर्यटन दिन" म्हणून साजरा केला जातो- अध्यक्ष मनोज घरत.. आज जागतिक पर्यटन दिन..


राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-
 आज  "जागतिक पर्यटन दिनाचे" औचित्य साधुन .बफं अलिबागजी कृषी पर्यटन विकास संस्थेने मांडवा ते अलिबाग मोटर सायकल रॅली काढण्यात आली.. सकाळीत्याच्या साधारण नऊ वाजता रॅली ची सुरुवात होऊन मांडवा सासवणे आवास येथून रॅली थळबिच येथे आली. त्या नंतर  *थळ पर्यटन व्यावसायिक संघा* तर्फे स्वागत करण्यात आले.त्यानंतर परसोली मार्गे सरखेल कान्होजी आंग्रे समाधी जवळ समारोपासाठी 
 आंग्रे घराण्यातील वंशज मा.रघुजी राजेे आंग्रे,उपस्थित होतेत्या वेळी अध्यक्षीय भाषणात श्री.मनोज घरत यांनी खालील मनोगत व्यक्त केले..
अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था गेल्या सोळा वर्षापासून "पर्यटक आणि पर्यटन व्यवसायिक" यांच्या हितासाठी काम करत आहे.गेली अनेक वर्षे आम्ही अलिबागच्या पर्यटन वाढीसाठी आणी पर्यटन व्यवसायीकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या मागे लागून  काम करीत आहोत.

  सन1980 पासून "27 सप्टेंबर" हा सर्व जगात "जागतिक पर्यटन दिन" म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी संयुक्त राष्ट्र समितीने  "इंडोनेशियाला" पर्यटनाचे यजमानपद दिले आहे.
आणि  री थिंकिंग टुरिझम ही थीम घेऊन जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जाणार आहे.

 मागील दोन वर्षाच्या कोविड-19 या महामारी नंतर पर्यटन क्षेत्राच्या विकासाचे "पुनरावलोकन" "पुनर्विचार" आणि "पुनर्विकासा वर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही थीम निवडली गेली आहे.
 गेल्या दोन वर्षात आपण सुद्धा या महामारीमुळे त्रासलो आहोत. त्यामुळे आपल्याला सुध्दा *अलिबागच्या      "पुनर्विचार" करुन "पुनर्विकास" करणे गरजेचे आहे.*
 अलिबागच्या अर्थव्यवस्थेला *धार* देऊन अलिबागची प्रतिमा,ब्रँड व्हॅल्यू आणि ओळख निर्माण  करायची असेल तर सर्व जगाला भुरळ पाडणाऱ्या अलिबागच्या निसर्ग सौंदर्याबरोबरच, शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास वगळुन पुढे जाता येणार नाही.

 सरखेल कान्होजीं राजेंनी अलिबाग शहराची स्थापना केली.महाराजांनी 1680 मध्ये कुलाबा किल्ला बांधला
हा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे.

 परंतु साधारण 13-14 वर्षांपूर्वी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे माझ्या "सृष्टी फार्म" येथे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी थळ मधील खूबलढा व खांदेरी किल्ला आणि कुलाबा किल्ल्याच्या बांधणीसाठी येथे वसलेल्या बारा बलुतेदारांनी दिलेल्या  योगदानाचा जिवंत इतिहास डोळ्यासमोर ठेवला.

 अंगावर काटा आणणारा हा इतिहास आपल्या जनतेच्या व पर्यटकांच्या समोर ठेवणेही काळाची गरज आहे.

 यासाठी कान्होजी राजे आंग्रें यांचा इतिहासावर  आधारीत एखादा "लेझर शो", संग्रहालय या सारख्या अनेक गोष्टी अलिबाग मध्ये होणे अपेक्षित आहेत. त्यातून पर्यटनाला चांगली चालना मिळू शकते.

आजवर अनेक गोष्टी केल्या गेल्या असल्या तरी त्या कासव गतीने होत आहेत.
आज-काल "प्रादेशिक पर्यटन" या गोंडस नावाने कोट्यावधी रुपये खर्च केला जातोय. परंतु यामुळे प्रत्यक्ष विकासाला  किती चालना मिळते हे पाहत गरजेच आहे.

हल्ली विकासाची व्याख्याच मुळी कॉन्ट्रॅक्ट वर आधारीत आहे.

 हे राजकीय व्यासपीठ नाही याची मला नक्की जाणीव आहे. पण पर्यटन विकासाला धार द्यायची असेल तर शासन, प्रशासन यांनी जनतेबरोबरच येथे पर्यटन क्षेत्रात काम करत असलेल्यांना विचारात घेऊन काम केले तर त्याचा थेट परिणाम दिसून येईल याचा विचार केला जात नाही.

अलिबागचा विकास निधी कुठे व कसा खर्च करावा यासाठी पुण्याच्या कोणत्यातरी कंपनीला काम दिलं जातं.... आणि मग ते "टेबल"वर बसून "गुगल सर्च" मारत अलिबागच्या पर्यटन विकासावर अहवाल सादर करतात.... हे  दुर्दैव आहे.
आजवर आपण  अलिबागचे चविष्ट पदार्थ , निखळ सौंदर्य आणि कान्होजी आंग्रे यांचा इतिहास ,यावर उत्सव साजरे करुन मिरवत आणि जगत आलो आहोत. 
पण आता आपल्याला 
स्थानिक *कला* ,संस्कृती, निसर्ग आणि कान्होजीं राजांचा *इतिहास* जपण्यासाठी *रणांगणात* उतरून काम करावं लागणार हे नक्की....
 त्याकरता  मी माननीय रघुजी राजे आंग्रे यांना विनंती करतो की त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच महाराष्ट्र शासन,प्रशासनाच्या दरबारी जे जे करावे लागेल त्यासाठी आमची तयारी आहे. आपल्या बरोबरीने आम्ही सर्व संघटित असलेले पर्यटन व्यावसायिक  म्हणजे कॉटेज धारकांबरोबरच येथील रिक्षावाले, सितारे वाले,भाजी व्यवसाय करणारे व ज्यांचा ज्यांचा या पर्यटनावर उदरनिर्वाह चालतो असे आम्ही सर्व आपल्याला आश्वासित करतो की आपल्या नेतृत्वा खाली आम्ही काम करायला तयार आहोत.

आपण सर्वजण मिळून अलिबागची संस्कृती, गडकिल्ले, निसर्ग सौंदर्य आणि अलिबागचा *श्रीमंत* इतिहास जिवंत ठेवण्यासाठी काम करूया.
त्या प्रसंगीअलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष पडवळ,सह सचिव विजय कदम,अमिष शिरगांवकर,व पदाधिकारी व सदस्य हजर होते
close