अनिल मंजूळकर । मेहकर :-
पाल्य हीच आपली गुंतवणूक समजणाऱ्या पालकांनी आता आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे सुरू केले असून वेगवेगळ्या कोर्स ला आपल्या पाल्याना पाठवून तो त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावा यासाठी पालक देव पाण्यात बुडवून ठेवत असतांना दुसरीकडे मात्र एकाच वर्षांत 4 महत्वाच्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याचा आणि शासकीय वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरण्याइतपत गुण पटकावणाऱ्या यश रामेश्वर चव्हाण या चिमुकल्याने एकाच वर्षात 4 परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
यश रामेश्वर चव्हाण हा तालुक्यातील गणपूर येथील मूळ रहिवाशी असून त्याचे वडील अकोला येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.
यश चव्हाण ने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTSE),
किशोर वैज्ञानिक योजना परीक्षा (KVPY),
राष्ट्रीय प्रवेश व पात्रता चाचणी (NEET) आणि
संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ह्या 4 महत्वपूर्ण परीक्षा एकाच वर्षात आणि पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केल्या आहेत.
त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अकोला जिल्हाधिकारी यांनी त्याचा सत्कार देखील केला आहे हे विशेष !
यश च्या या यशाने गणपूर या गावी आनंद व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे गत वर्षी त्याची बहीण साक्षी चव्हाण हिने देखील नीट च्या परिक्षेत उत्तम गुण पटकावून एमबीबीएस ला प्रवेश घेतलेला आहे

