कोल्हापूर : पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरुन जात असताना एस.टी. बसचा टायर फूटुन आपघात झाला आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना पहाटेच्या सुमारास पंढरपूरच्या अंबाबाई पटांगणाजवळच्या नवीन पुलावर घडली.बसमधील सर्व ५० प्रवासी सुखरुप आहेत.टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूर आगाराची एस.टी. बस माजलगावहून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर बसचा पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली आहे.
यात बस पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळली.
या दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.पहाटे ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले.
यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस कठड्याच्या दिशेनं गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.
या बसमध्ये ५० प्रवासी होते.
जर या पुलाला लोखंडी बॅरिकेटिंग आणि कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती. पहाटेच्या सहाच्या सुमारास ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले.
यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस कठड्याट्या दिशेने गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

