shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोल्हापूर : लहान मुलीसह महिलेनी विहिरीत ऊडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न: वडणगे येथील घटना: मुलीचा मृत्यू..

वडणगे (ता. करवीर): येथे ६ महिन्यांच्या बालिकेसह विवाहितेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तनुजा चव्हाण असं त्या दुर्देवी बालिकेचे नाव आहे. तर मोनिका चव्हाण हिला वाचवण्यात यश आले.

या विषयी अधिक माहिती अशी की, येथील चौगले मळ्यात लमान समाजातील परशुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबासह राहतात. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी मोनिका आपल्या सहा महिन्यांच्या तनुजा या मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराजवळ असलेल्या विहिरीत मुलीसह त्‍यांनी उडी घेतली. विहिरीजवळ असलेल्या नागरिकांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला.

       मोनिका हिला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठाला आली. त्यानंतर तिला नागरिकांनी बाहेर काढले, मात्र या घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. करवीर पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
close