shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.प्राजक्त तनपूरे यांनी १० वी वर्गात विद्यार्थ्यांना पायथा गोरस प्रमेय शिकवले ‼️ माजी मंत्री प्राजक्त तनपूरे हे हातात खडू व डस्टर घेऊन शिक्षक बनले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२

राहुरी :  आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये अचानकपणे भेट देत थेट वर्गातील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिल्याचे चित्र दिसून आले. उच्चशिक्षिम आमदार म्हणून प्रचलित असलेले आ. तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना गणिताच्या सोप्या पद्धती शिकविल्याचे पाहून शिक्षकांसह विद्यार्थीही अवाक झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी हितकारक ठरणारे निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडू. मंत्रालयामध्ये राहुरी मतदार संघामध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी पायाभूत सोय सूविधा उपलब्ध करणार  असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

      माजी मंत्री तनपुरे हे शाळेत आल्याचे पाहून गाडगे महाराज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी ढोल, ताशाच्या गजरात घोषणाबाजी करीत आ. तनपुरे यांचे जंगी स्वागत केले. यानंतर आ. तनपुरे यांनी थेट इयत्ता दहावीच्या वर्गात उपस्थिती देत हातामध्ये खडू व डस्टर घेतला. फळ्यावर गणिताचा वर्ग सुरू केला. गणित विषय शिकवित असताना आ. तनपुरे यांना असलेली शिक्षणाची गोडी दिसून आली. विद्यार्थ्यांशी अत्यंत विनम्रपणे संवाद साधत असताना गणिताच्या सोप्या पद्धती फळ्यावर मांडल्या. गणित विषयातील प्रमेयांची मांडणी, प्रमेयाद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने गणिताची सोडवणूक पाहता विद्यार्थी, शिक्षकांसह उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाले. अमेरिकेमध्ये अभियंता पदाचे अध्ययन त्यांच्या शिकवणीमध्ये ठळकपणे दिसत होती. भूमिती  विषयामधील त्रिकोण आकृत्या, प्रमेय यांचा साध्या सरळ व सोप्या भाषेमध्ये मांडणी करीत विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये मिळालेल्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान उमटले होते.
श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देताना आमदार प्राजक्त तनपुरे

     याप्रसंगी आ. तनपुरे यांनी सांगितले की, शिक्षणा विषयी मला पूर्वीपासूनच आवड आहे. राजकीय क्षेत्रात आलो नसतो तर नक्कीच शिक्षक होऊन विद्यार्थी घडविण्याचे काम केले असते. परंतु जनसामन्यांच्या आशिर्वादाने मोठे पाठबळ लाभले आहे. आमदारच नव्हे तर नामदारकीही मिळाली होती. अजूनही लोकप्रतिनिधी म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी हितकारक ठरणारे निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडू. मंत्रालयामध्ये राहुरी मतदार संघामध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी पायाभूत सोय सूविधा उपलब्ध करणार  असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

    याप्रसंगी संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका भारतीताई खिलारी, मुख्याध्यापक जे.व्ही. खर्चे, मिलिंद गुजरे शिक्षक किरण पवार, मिनाक्षी लोखंडे, निलिमा व्यवहारे, अंबादास उंडे  आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर, गंगाधर तमनर, ज्ञानदेव बाचकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. वाढदिवसाचे औचित्य साधत नगरसेवक ठाकूर यांनी मुलांना वह्या, फळे व खाऊचे वाटप केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 
close