" *श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा* .
इंदापूर प्रतिनिधी - येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविदयालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिपक पाटेकर मॅनेजिंग डायरेक्टर एमकेसीएल पुणे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्या बद्दल माहिती देऊन आज मुलांनी महाविद्यालयीन पदवी बरोबरच स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करणं आवश्यक आहे प्रत्येक क्षेत्रात नैपुण्य मिळवण्यासाठी कौशल्य पूर्ण स्किल आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थी दशेत आपण सर्वांनी प्रयत्न करावेत आपणास निश्चित यश मिळेल तसेच विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते त्यांनी विद्यार्थिनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून स्वतःला सिद्ध करण्याची महादयालयीन जीवनात गरज असल्याचे प्रतिपादन केले तसेच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक दिनानिमित्त अंबिशन व्हेंचर कम्प्युटर एज्युकेशनचे श्री आशिष नायकुडे सर यांचेकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांचा आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना प्रसिद्ध पत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तायाजी लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन श्रुतिका कोकाटे या विद्यार्थ्यीने केले तर आभार चेतन काटे या विद्यार्थ्याने मानले.

