shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन.ई . एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी.

एन.ई . एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर  येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी.
इंदापूर प्रतिनिधी:एन.ई . एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
 यावेळी यशवंत विविध विकास कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे ,राजे उमाजी नाईक संघटना इंदापूर तालुका अध्यक्ष लालासाहेब चव्हाण व प्रकाश चव्हाण, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे इत्यादींनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
चंद्रकांत रणवरे ,मधुकर खरात, वैभव हनुमते, आजिनाथ मलगुडे यांनी व लालासाहेब चव्हाण यांनी यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या इतिहासाची उकल करून दिली.
 या कार्यक्रमास निमसाखर येतील ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद चव्हाण यांनी केले
close