विद्या प्रतिष्ठान इंदापूर येथे पालक संघटनेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा.
शिक्षक जसे मुलाला घडवतील तसेच त्याचे आयुष्य घडते - पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे विद्या प्रतिष्ठान शाळेत पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात शाळेच्या प्राध्यापक ज्योती जगताप मॅडम व इतर सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक व शिपाई कर्मचारी यांना वृक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी असणारा पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळेस बोलताना पालक शिक्षक संघटने प्रमुख नानासाहेब खरात आपल्या भाषणात म्हणाले की, समाजाच्या देशाच्या जडणघडणेत ७० टक्के वाटा हा शिक्षकांचा आहे. शिक्षक जसे मुलाला घडवतील तसेच त्याचे आयुष्य घडते. गुरुच्या मार्गदर्शनावर माणसाचे आयुष्य अवलंबून असते आणि अशा गुरूंचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला आज लाभले हे आमचे भाग्य.
यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्या प्रतिष्ठानच्या प्राध्यापक ज्योती जगताप मॅडम यांनी भूषवले तसेच डॉक्टर राणी ताटे ,जगताप मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी पालक शिक्षक संघटनेचे सचिव निमगाव येथील हर्षवर्धन पाटील ,सलोनी भोसले ,वैभव गटकुळ ,रवींद्र भोंग , डॉक्टर राणी ताटे ,प्रियंका शहा ,वैशाली माने ,इनामदार मॅडम बर्डे सर, ननवरे मॅडम शिक्षक कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा वाघमारे मॅडम यांनी केले.

