shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूपासून धडा..!

तुम्ही कितीही महागड्या आणि कितीही सेफ समजल्या जाणार्या कार मधे प्रवास करत असाल आणि सिट बेल्ट लावत नसाल तर तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो…

म्हणुन तुम्ही मागच्या सीटवर बसत असलात तरीही सीट बेल्ट लावा….

सायरस मिस्त्री मागच्या सीटवर बसले होते, जे दोन लोक वाचले ते समोर सीट बेल्ट लावून बसले होते…

सीट बेल्ट बांधला नसेल तर एअरबॅगचा काही उपयोग नाही जी first line of defence आहे….

पहिल्याचे पालन केले तरच एअर बॅग ही संरक्षणाची दुसरी फळी आहे,तुम्ही बसलेल्या खुर्चीच्या सीट बेल्टला नीट लॉक न केल्यास एअर बॅग उघडणार नाही….

सरकारच्या नियमानुसार सर्व गाड्यांमध्ये मागील सीट बेल्ट असतात, परंतु फार कमी लोक त्यांचा वापर करतात, हा एक भ्रम आहे की मागील भाग खूप सुरक्षित आहे….

अपघाताच्या वेळी पाठीमागील व्यक्तीला कधीकधी 40G (गुरुत्वाकर्षणाच्या 40 पट, म्हणजे 80kgs वजन असलेल्या व्यक्तीचे वजन 3200kgs) बळावर फेकले जाते….

जर समोरच्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला असेल आणि मागच्या प्रवाशांनी सिट बेल्ट लावला नसेल तर, अपघाताच्या वेळी पाठीमागचे प्रवासी समोर फेकले जाऊन समोरचे प्रवासी पाठीमागील व्यक्ती च्या वजनाने गंभीर जखमी किंवा ठार होण्याची शक्यता असते….

कृपया तुम्ही प्रवास करत असताना सुरक्षा नियमांचे पालन करा….सिट बेल्ट लावाच…👍🏻

जनहितार्थ जारी...
close