shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे गावच्या युवकांची विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी- प्रा. सुहास पाखरे


युवकांचा सत्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी : संजय वायकर

 नगर :  १५ / अहमदनगर तालुक्यातील नगर - मनमाड रोडवरील मोठ्या लोकसंख्येचे व नगर शहरापासून साधारण १८ कि. मी . अंतरावर असणारे गाव म्हणजे देहरे. अलीकडच्या काळात देहरे येथील युवक विविध राजकीय, आर्थिक , धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात चमकताना दिसत आहेत. देहरे गावच्या आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने चालत असलेल्या अकॅडमीचे मार्गदर्शक मा. संतोष गणपत काळे यांच्या माध्यमातून विविध पोलीस भरती, अग्नीवीर भरती , सैनिक भरती सुरक्षा विभाग भरती मध्ये बरेचसे युवकांची निवड होताना दिसत आहे . गरीब कुटुंबातील विशाल हरिदास पाखरे यांची महाराष्ट्र सुरक्षा विभाग (एम एस एफ) मध्ये निवड झाली.

पंचक्रोशीतील प्रसिद्ध कुस्तीपटू कै.पै.रमेश जाधव यांचे नातू व नवनाथ जाधव यांचे पुतणे पै.युवराज जाधव यांनी नुकत्याच झालेल्या धावडे संचलित कुस्ती स्पर्धेमध्ये ४२ किलो वजन गटात गोल्ड मेडल मिळवले .अशा विविध क्षेत्रात युवक उत्कृष्ठ कामगिरी करत आहेत . 

या युवकांचा सत्कार सोहळा देहरे ग्रामस्थ व अल्पाधवीतच नावाजलेले संजीवनी क्लिनिकचे डॉ .अंगद खाडे यांनी आयोजित केला होता .

 याप्रसंगी अडसूळ एमबीए कॉलेजचे संचालक प्रा.सुहास पाखरे म्हणाले की, देहरे पंचक्रोशीतील युवक ही एक मोठी ऊर्जा आहे . गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून विविध क्षेत्रात प्रगतीपथावर जाण्याचा युवकांचा मानस आहे . 
यावेळी उपस्थित युवकांना प्रा. सुहास पाखरे यांनी मार्गदर्शनही केले . 

या सत्कार सोहळ्यासाठी पं.समिती सदस्य व्ही. डी. काळे, देहरे सरपंच मा. बबन करंडे देहरे वि.का. से. सो. चे अध्यक्ष मा. संजय काळे , मा. तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे,ग्रा. सदस्य मेघनाथ धनवटे , भानुदास भगत, किरण लांडगे, स्वप्निल लांडगे ,मा. सरपंच सुभाष खजिनदार, सुनील  बालवे मेजर , मच्छिंद्र पठारे ,महेश काळे ,जुनेद खान ,जालिंदर काळे ,संभाजी पाखरे, यादव काळे,  ज्ञानदेव काळे ,अमोल काळे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे  ,नवनाथ पाखरे, किरण हरेर आदी उपस्थित होते.
close