shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यामध्ये लंम्पी रोगावरील लस व औषधांचा तात्काळ पुरवठा करणार - राधाकृष्ण विखे पाटील - हर्षवर्धन पाटील यांची विखे पाटलांशी चर्चा.

इंदापूर तालुक्यामध्ये लंम्पी रोगावरील लस व औषधांचा तात्काळ पुरवठा करणार - राधाकृष्ण विखे पाटील
 - हर्षवर्धन पाटील यांची विखे पाटलांशी चर्चा.
 
इंदापूर : प्रतिनिधी दि.१५ सप्टेंबर २०२२
       इंदापूर तालुक्यात लंम्पी रोगावरील उपयुक्त लस व उपचारासाठी सर्व औषधांचा पुरेसा साठा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन आयुक्त  सचिंद्र प्रताप सिंह यांना दिले. मुंबईत गुरुवारी (दि.१५) भाजप नेते व माजी मंत्री व हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी  इंदापूर तालुक्यात लंम्पी रोगावरील उपचारासाठी औषध साठा शिल्लक नसल्याने, औषधांच्या पुरवठ्या संदर्भात निवेदन दिले व चर्चा केली. सदर प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन आयुक्तांना वरील आदेश दिले.
            सन २०२० च्या जनगणनेनुसार इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे २ लाख एवढ्या मोठ्या संख्येने पशुधन आहे. आज पर्यंत तालुक्यामध्ये ५५ गावांमध्ये लंम्पी रोगाचा प्रसार झाला असून बाधित जनावरांची संख्या ६० एवढी आहे. आजअखेर तालुक्यात ४० हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले असून, आणखी १.५ लाख जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. सध्या तालुक्यात लंम्पी रोगावरील उपचारासाठी औषधांचा साठा शिल्लक नसल्याने तो तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. यावेळी इंदापूर तालुक्यामध्ये उपचारासाठी लागणाऱ्या सर्व औषधांच्या मागणीची संख्या हर्षवर्धन पाटील यांनी मंत्र्यांकडे दिली. त्यानुसार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लस व उपचारासाठी सर्व औषधे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे  आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना दिले. या रोगा संदर्भात शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
_
close