shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूरतील साठेनगर येथे गरजू महिलांना केल्या साड्या वाटप.

माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूरतील साठेनगर येथे गरजू महिलांना केल्या साड्या वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या ५७ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर शहरातील साठेनगर येथे गरजू महिलांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साड्या वाटप माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आल्या.
यावेळी धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, राष्ट्रवादीचे बाळासाहेब व्यवहारे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर चौगुले, रामदास चौगुले, बापू अडसूळ, नवनाथ पवार, गोट्या डावरे, रंजीत डावरे,मयूर डावरे ,राजू शिंदे तसेच साठे नगर येथील इतर कार्यकर्ते आणि श्रीधर बाब्रर मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले की, श्रीधर बाब्रस हे माझे मित्र असून त्यांनी आयुष्यात एक लक्षात ठेवले पाहिजे की, गरीब माणसांना केंद्रबिंदू मानून जेवढे काम करता येईल .गोरगरीब माणसांची कामे केली तर ते माणसे आयुष्यभर विसरणार नाहीत. त्यामुळे गोरगरीब माणसांची कामे अशीच चालू ठेवून आयुष्याची पुढील वाटचाल करावी. माझ्यासह माझ्या भरणे कुटुंबीयांच्या वतीने अभिष्टचिंतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले.

तसेच धर्मवीर संभाजी मित्र मंडळ चौक कसबा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे व धनंजय बाब्रस आणि इतर मित्र परिवाराच्या वतीने फार फेटा घालून केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला .
close