shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डेंगू चिकनगुनियाच्या नियंत्रणासाठी इंदापूर शहरांमध्ये उपाययोजना करा - इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीने दिले नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे निवेदनपत्र.

डेंगू चिकनगुनियाच्या नियंत्रणासाठी इंदापूर शहरांमध्ये उपाययोजना करा - इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीने दिले नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे  निवेदनपत्र.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी इंदापूर शहरांमध्ये डेंगू व चिकनगुनिया या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी इंदापूर नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना कराव्यात म्हणून इंदापूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे निवेदन पत्र दिले आहे.
या निवेदन पत्रात नमूद केले आहे की, आम्ही आपल्या निदर्शनास आणून देतो की, इंदापूर शहरांमध्ये वाढत चाललेल्या डेंगू व चिकनगुनिया च्या साथीमुळे इंदापूर शहराची जनता हैराण झाली आहे. इंदापूर शहरातील सर्व दवाखाने पूर्ण क्षमतेने डेंगू व चिकनगुनिया च्या रुग्णाने भरलेले असून आपण शासन स्तरावर याची गंभीर दखल घ्यावी .लवकरात लवकर या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करावे असे निवेदन पत्र इंदापूर नगरपालिकेला सादर करण्यात आले आहे.

सदर निवेदन पत्र नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर व आरोग्य विभागाचे मनोज बारटक्के यांच्याकडे सादर  करताना तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, काका देवकर तालुका कार्याध्यक्ष,  अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड, समीर शेख, अशोक बोडके, नवनाथ भंडलकर, अलंकार भंडलकर इत्यादी उपस्थित होते.
close