२८१ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाहीर झालेल्या निवडणुका संदर्भात शिव सहकार सेनाची नियोजन बैठक शिवसेना भवन डेक्कन पुणे येथे पार पडली.
पुणे जिल्हा संघटक रमेश जाधव व ॲड.सारिका जगदीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुका संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पाताई सर पोतदार यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेना उपाध्यक्ष प्रदीप खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सहकार सेना पुणे जिल्हा संघटक रमेश जाधव व ॲड. सारिका जगदीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन डेक्कन पुणे येथे बैठक पार पडली.
सदर बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, निरा, पुरंदर ,बारामती, इंदापूर ,दौंड ,शिरूर, जुन्नर, आंबेगाव ,खेड व मावळ या अकरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका त्या संदर्भात नियोजन व बांधणी करणे कामी ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटी संचालक इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली.
तसेच भोर ,वेल्ला, पुरंदर ,दौंड, शिरूर व खेड तालुक्यातील रिक्त पदे भरण्यासंबंधी सखोल चर्चा करून उपनेते निर्लेकर व उपनेते सचिन अहिर यांच्याशी चर्चा करून नियुक्त्या करण्याचे ठरले. अशी माहिती शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक सुरज काळे यांनी दिली.
मा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे,उपनेते रविंद्र जी मिर्लेकर साहेब, उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा सचिनभाऊ अहिर, शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पाताई सरपोतदार यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेना उपाध्यक्ष मा .प्रदिप खोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सहकार सेना पुणे जिल्हा संघटक मा .रमेश जाधव व ॲड.सारिका जगदीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन डेक्कन पुणे येथे बैठक पार पडली
पुणे जिल्ह्यातील मुळशी,भोर,(निरा, पुरंदर)बारामती, इंदापूर,दौंड,शिरूर, जुन्नर, आंबेगाव,खेड,व मावळ या अकरा तालुक्यातील कृ. उ.बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.त्या संदर्भात नियोजन व बांधणी करणेकामी ग्रामपंचायत सदस्य व विकास सेवा सोसायटी संचालक इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली.
भोर,वेल्हा, पुरंदर, दौंड, शिरूर,व खेड या तालुक्यातील रिक्त पदे भरण्या संबधी सखोल चर्चा करून उपनेते मिर्लेकर साहेब व उपनेते सचिनभाऊ अहिर यांच्याशी चर्चा करून नियुक्त्या करण्याचे ठरले.

