पळसदेवचे माजी सरपंच अनिल खोत यांचे निधन
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १४
पळसदेव (ता. इंदापूर) येथील अनिल खोत (वय ५०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले . गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना ह्दयविकाराची झटका आला होता .तेव्हापासून त्यांच्यावर बारामती येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते . उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला . अनिल खोत सामाजिक कार्यात अग्रेसर होते .
उजनी पाणी प्रदूषण , शेतमालाला हमी भाव , तंटामुक्ती ,जलसंधारण या विषय बाबत त्याचे विशेष कार्य होते . त्यांच्या विशेष प्रयत्नाने गावाला तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला होता . उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन ,उपोषण करून धरणग्रस्तना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न केले होते . पर्यावरण विषय यांनी विशेष कार्य केले . त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुलगा ,मुलगी , भाऊ भावजय आसा परिवार आहे . त्यांच्या निधनाने गावावर शोक काळा पसरली आहे .
फोटो : कै अनिल खोत .

