shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मारूती प्रात:स्मरण..



अंजनीसुत हनुमंत पाहता
जुळती कर नमतो हा माथा
विश्वव्यापी जो चिरंजीव ही
सकल जनांसी स्फूर्तीदाता...१

रघुवीर दास हनुमंत उपकारी
सकल दुःख अन् ताप विनाशी
रघुकुल हीत जागृत बजरंगी
वन-वानर कुल मारूती बलशाली...२

अष्टसिद्धी तव महान शक्ती
सकल जनांसी देते स्फूर्ती
कार्यसिद्धीस्तव तुझीच भक्ती
यश दे, दे मज आनंद किर्ती...३

जागृतशक्ती चिरंजीव विरा
हरसी क्लेश, अन् दुष्ट विचारा
लक्ष्मण संजीवक, संकट हर्ता 
जय हनुमंत तुज चरणी माथा..४

श्रीरामास्तव गगन भेदीले
लंका जाळून शौर्य प्रेरीले
राम जानकी भेट घडवूनी
रामदासी व्रत सदैव जपले...५

जय बजरंग मारूती हितकारी
विनवणी तुज करीतो अज्ञानी
सकल जनांसह मला शक्ती दे
घडो राष्ट्रभक्ती, दिनरात्री...६

रामभक्ती जगी सात्विक शक्ती
प्रचारार्थ दे सकलां शक्ती
स्मरीत जगावे सदैव वैभव 
राष्ट्रभक्ती ही श्रीराम भक्ती...७

पुण्यरत्न : डॉ. चंद्रकांत शहासने.
मो. ९८८१३७३५८५
close