हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२०,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने दि.१७ व १८ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा समितीच्या औरंगाबाद महिला जिल्हाध्यक्षा अंजनाताई राजपूत यांना सामाजिक कार्यासाठी "स्वामी रामानंद तीर्थ राज्यस्तरीय"पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत लातुर येथे प्रणवश्री मंगल कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व समितीचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले या कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा समितीच्या औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा अंजनाताई राजपूत यांनी समितीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडत करीत सर्वसामान्य दलीत,अपंगाना सामाजिक कार्यातुन सहकार्य केले असुन या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या हस्ते "स्वामी रामानंद तीर्थ राज्यस्तरीय पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे,अ.भा.स्वातंत्रता सेनानी समितीचे उत्तराधिकारी रंविद्र यळणुरकर,अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे माजी सैनिक प्रदेशाध्यक्ष उल्हास पाटील,राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीमभाई शेख,राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर,युवक कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे-पाटील,राष्ट्रीय महिला अध्यक्षा डाँ.कविता रायजादे,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ,महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.राणीताई स्वामी,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज सिंह खंडापुरकर,प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण-देशमुख,प्रदेश अध्यक्ष शिक्षण विभाग प्रा.राजेंद्र पालवे,प्रदेशाध्यक्ष किसान विभाग अविनाश जाधव,मिडीया प्रदेशाध्यक्ष समिर जमादार,मिडीया प्रदेशाध्यक्ष संतोष ठाकरे,प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन सुमित दोरगे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,युवती प्रदेशाध्यक्षा सनाताई शेख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शेख फिरोज, सिल्लोड तालुका महिला अध्यक्षा राधाताई झेलवार,सोयगांव तालुकाध्यक्ष पत्रकार गोकुसिंग राजपूत,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख आदीसह औरंगाबाद जिल्ह्यातील समितीचे पदाधिकारी व राज्यभरातुन आलेले इतर जिल्ह्यातील पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अंजनाताई राजपूत यांचे सर्व पदाधिकाऱ्यांतुन अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव झाला.यापुढे ही मी भ्रष्टाचार उघड करुन सर्वसामान्य दलीत,अपंगाच्या न्याय हक्कासाठी लढा चालुच ठेवणार असल्याचे प्रदिपादन "शिर्डी एक्सप्रेस"च्या प्रतिनीधीशी बोलतांना केले आहे.


