shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Breaking : Raju Shrivastav Death news जगप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन.

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

भारतातील महान कलाकार व जगप्रसिद्ध विनोदाचा बादशहा म्हणून‌ प्रसिद्ध असलेल्या कानपूर हून निघून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा हास्य सम्राट राजू श्रीवास्तव याचे आज निधन झाले. 

10 ऑगस्टला हृदय विकाराचा झटका आल्यावर  राजू श्रीवास्तव यांना दिल्ली येथील एम्स हाॅस्पिटला एडमिट करण्यात आले. तेव्हा पासून ४१ दिवस ते मृत्यूशी झूंझ देत होते..परंतु अपयश येऊन‌ ५८ वर्षीय राजू  श्रीवास्तव यांनी आज बुधवारी १०.२० ला अखेरचा श्वास घेतला.
कॉमेडिचा बादशहा अशी त्याची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे (bollywood celebrity) मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री मंत्री योगी सह  मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला (social media viral news) अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते.

90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.

डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात येत होते.
close