shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लहुजी सेनेच्या सत्काराने कुमारी सानिया मणियार गेली भारावून..!

नांदूरखी वार्ताहार:- राहाता तालुक्यातील डोर हाळे येथील स्वर्गीय पत्रकार पीर महंमद मणियार उर्फ बाबा मणियार यांची मुलगी कुमारी सानिया मणियार हिने बारावी परिक्षानंतर cet स्पर्धा परीक्षा मध्ये 99.75% पाडून यश संपादन केल्याबद्दल तिचा भारतीय लहुजी सेना कमिटीच्या वतीने शाल गुच्छ देऊन तिचा व तिच्या मातोश्रींचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

Cet परीक्षेत कुमारी सानिया मणियार हिने 99.75 % विक्रमी गुण मिळविल्याबद्दल सत्कार करतांना राज्य सरचिटनिस रामभाऊ पिंगळे राज्य संघटक भाऊसाहेब आव्हाड


या सत्कारामुळे अक्षरशः दिड वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या निधनानंतरही धीर न सोडता या मोठ्या संकटावर मात करून आईच्या कष्टाची जाण ठेवून भरघोष यश संपादन केल्याने या आनंदाची सीमा पार केल्याने व सत्काराच्या शाबासकीच्या उभारनीने अक्षरशः तिच्या चेहऱ्यावर हसू दिसून येत होते हा सत्कार म्हणजे माझ्या जीवनातील भविष्याच्या उतकर्षाचा सम्मान असल्याचे दिसून येत होते वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून प्रत्येक मुलीने आपल्या कुटुंबाची महती शिक्षणाच्या माध्यमातूनच जनतेसमोर प्रगट करणे प्रत्येक मुलीने चिकाटी प्रयत्न करून आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली तर संपूर्ण जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उचाक भरारी घेणे भविष्याच करिअर घडविणे म्हणजे मुलीचा सम्मान असल्याचे यावेळी तिने भावनिक उद्गार काढले.

या यशामागे माझ्या शाळेचे सर्व शिक्षक आई वडील व जेष्ठ मार्गदर्शक याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही तिने यावेळी आवर्जून सांगितले आज जागतिक कन्या दिन असल्याने याच निमित्ताने माझ्या सारख्या सर्व सामान्य मुलीचा सम्मान होतो यातच खरा आनंद असल्याचे तिने यावेळी सांगितले यावेळी भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस रामभाऊ पिंगळे राज्य संघटक भाऊसाहेब आव्हाड आदींनी तिच्या कुटुंबियासमवेत तिचा सत्कार केला.
close