shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भव्य पायी लॉंग मार्च.. नगर मनमाड रस्ता प्रकरण...!!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी :-
वंचित बहुजन आघाडी उत्तर अहमदनगर वतीने भव्य पायी लॉंग मार्च सोमवार दिनांक २६/९/२००२ रोजी काढत आहोत ठिकाण-सावळविहिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ठीक सकाळी १०वाजता तरी वंचित बहुजन आघाडी उत्तर अहमदनगर जिल्हा पदाधिकारी ,सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी,युवक आघाडी ,महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपण पायी लॉंग मार्च करणार्यांना आपण उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात. 

         हा पायी लॉंग मार्च नगर मनमाड रस्त्याची झालेली दयनीय अवस्था व दररोज होणारे अपघात व त्यात दररोज कोणाच्या ना कोणाच्या घरातील इसम मयत होत आहे व ते पूर्ण कुटुंब घरातील करता पुरुष गेल्यामुळे उध्वस्त होत आहे तरी आपले लोकप्रतिनिधी झोपल्याचे सोंग घेत आहे, हा रस्ता लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या खेळात अडकून पडला आहे, वंचित बहुजन आघाडीचे खुलं आव्हान आहे की जे कोणी लोकप्रतिनिधी टक्केवारी माघत होते त्या लोकप्रतिनिधींचे नाव जाहीर करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करिन व त्याच्यावर मनुष्यवदाचे गुन्हे दाखल करा जो कोणी ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर सुध्दा मनुष्यवदाचा गुन्हा दाखल कारावा, व आतापर्यंत जे अपघातात मरण पावलेल्या कुटुंबाला 10लाख भरपाई द्यावी पुढील काळात काम चालू झाल्यानंतर जर अपघात झाला तर त्या कुटुंबाला भरीव अशी मदत करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी पुढील काम होऊ देणार नाही, व लवकरात लवकर या राष्ट्रीय मार्गाचे काम चालू करावे व स्थानिक लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणामुळे या रोडाचे काम रखडले असल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडी करत आहे.
         या प्रमुख मागण्यासाठी व जनहिताच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढत राहणार ,लवकरात लवकर काम चालू झाले नाही तर या पुढे वंचित बहुजन आघाडी आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेन,,,, नगर मनमाड रस्ते अपघातात जे मृत पावले त्या सर्वांना वंचित बहुज आघाडी उत्तर अहमदनगर कडून हीच भावपूर्ण श्रद्धांजली..!

आपलाच
विशाल बबनराव कोळगे
जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी 
उत्तर अहमदनगर
close